स्‍वतंत्र भारताच्या जडणघडणीत डॉ. मुखर्जी यांचे अप्रतिम योगदान! कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ला

वर्धा : भरताची एकता व अखंडता स्‍थापण करणे तसेच स्‍वतंत्र भारताच्या जडणघडणीत डॉ. श्‍यामा प्रसाद मुखर्जी यांचे अप्रतिम योगदान राहिलेले आहे असे विचार महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांनी व्यक्त केले.

ते प्रख्‍यात शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्‍यामा प्रसाद मुखर्जी यांच्या 120 व्या जयंती निमित्त आयोजित तरंगाधारित राष्ट्रीय चर्चासत्रात अध्‍यक्ष म्हणून बोलत होते. मंगळवारी (6 जुलै) ‘सांस्‍कृतिक चेतना, राष्‍ट्रीय एकता व अखंडतेची प्रतिमूर्ती डॉ. श्‍यामा प्रसाद मुखर्जी’ या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कुलगुरु प्रो. शुक्‍ल यांनी ऐतिहासिक व राजकीय संदर्भात बोलतांना डॉ. श्‍यामा प्रसाद मुखर्जी यांनी दोन विधानाची अवधारणा या विरोधात जनजागरण व संघर्ष करत बलिदान दिले. आजच्या बिकट परिस्थितीत त्यांचे स्मरण करणे प्रासंगिक तसेच महत्‍वपूर्ण आहे असे सांगितले.
प्रो. शुक्‍ल यांनी कलम 370 समाप्‍त करणे व भारताच्या विभाजनाविषयी डॉ. मुखर्जी यांच्या विचारावर सारगर्भित विचार मांडले. राष्‍ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये डॉ. मुखर्जी यांच्या शिक्षणा संबंधी विचारावर विशेष लक्ष देण्यात आले आहे असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे संचालन शिक्षण विभागाच्या सहायक प्रोफेसर डॉ. शिल्‍पा कुमारी यांनी केले तर तांत्रिक शिक्षण विभागाचे सहायक प्रोफ़ेसर अनिकेत आंबेकर यांनी केले. आभार शिक्षण विद्यापीठाचे अधिष्‍ठाता प्रो. मनोज कुमार यांनी मानले.
कार्यक्रमात प्रो. हनुमानप्रसाद शुक्‍ल व प्रो. चंद्रकांत रागीट यांच्यासह अध्‍यापक, शोधार्थी तथा विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. श्‍यामा प्रसाद मुखर्जी विद्या भवनात कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल यांनी डॉ. मुखर्जी यांच्या चित्रावर माल्‍यार्पण तसेच पुष्‍पांजली अर्पित करत अभिवादन केले. यावेळी प्रकुलगुरु प्रो. चंद्रकांत रागीट, प्रो. मनोज कुमार, प्रो. कृपा शंकर चौबे, प्रो. गोपाल कृष्‍ण ठाकुर, प्रो. चतुर्भुज नाथ तिवारी, डॉ. के. बालराजु यांनीही डॉ. मुखर्जी यांना अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here