बाजारपेठेत जाताय सावधान! सौभाग्याचं लेणं अवश्य सांभाळाच…; चोरींच्या घटना वाढल्या : अनेक चोरींचा पोलिसांनी केला उलगडा

0
76

वर्धा : शहरातील बाजारपेठेत चेनस्नॅचिंमच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. दुचाकीस्वार महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचं लेनं हिसकावून पळ काढण्याच्या घटना घडत असल्याने महिलावर्गांत दहशत पसरली आहे.

पोलिसांनी अनेक चोरीच्या घटनांचा उलगडा केला असून लाखो रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. मात्र, तरी देखील वाढत्या घटनांमुळे पोलिसांच्या खांद्यावरील भारही वाढला असल्याचे दिसून येत आहे.शहरातील बाजारपेठेत मागील काही दिवसांत अनेक महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याच्या घटना घडल्याचे दिसून आले.

या घटनांमुळे पोलिसही अलर्टमोडवर आले असून बाजारपेठेत गस्तही वाढविण्यात आली. मागील दीड वर्षांच्या तुलनेत सोनसाखळी चोरांच्या घटनांमध्ये काही अंशी घट आली आहे. ही घट जरी दिलासादायक असली तरी पुन्हा अनलॉकमध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here