सात जुगाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या! कारवाई करुन गुन्हा दाखल

वर्धा : जुगार, सट्टा लावणाऱ्यांवर कारवाई सत्र जिल्ह्यात सुरु झाले असून, त्यानुसार देवळी, रामनगर, वर्धा, पुलगाव तसेच सेलू पोलिसांच्या वतीने धडक मोहीम राबविण्यात आली असून, सात जुजाऱ्यांना अटक केली. देवळी पोलिसांनी वाल्मिक श्रीधर लोखंडे (रा. वायगाव) याच्यावर कारवाई केली. रामनगर पोलिसांनी नीरज डाहाके, अमित नाखले यांच्यावर कारवाई करीत एक सीपीयु, माऊस असा एकूण १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

शहर पोलिसांनी पंकज मून (रा. सिद्धार्थनगर) आणि गरजान मिसळकर (रा. हवालदारपुरा) यांच्यावर कारवाई केली. पुलगाव पोलिसांनी कैलास चातूर, प्रमोद चौधरी, सुनील भस्मे यांच्यावर कारवाई करीत ताश पत्त्यांसह दोन मोबाईल, एक कार असा एकूण २ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. सेलू पोलिसांनी किशोर शेंद्रे (ग. केळझर) याच्यावर कारवाई करुन गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here