कोंबड्यांची झुंज लावून जुगार भरविणाऱ्या १४ जणांना अटक! सेलू तालुक्यातील चिचघाट शिवारातील चालू होता बाजार

सेलू : तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून कोंबड्यांची झुंज लावून हारजीतीचा जुगार खेळल्या जात होता. आज सायंकाळच्या सुमारास चिचघाट शिवारात सेलू पोलिसांनी अचानक धाड टाकून जुगार भरविणाऱ्या १४ जुगाऱ्यांना अटक केली.

पोलिसांनी सचिन बापूराव कुबडे रा. गोंडखैरी, दिनेश रुपचंद साठोडे, रा. गुमगाव, अमोल रमेश पराते रा. आंजी मोठी, विनोद ज्ञानेश्वर भोसले, रा. धपकी, चंदू गणेश भोसले, रा. धपकी, नेहार घनश्याम भोपचे रा. भवानीनगर जि. नागपूर, नंदकिशोर प्रेमचंद्र चकोले रा. पार्डी, मंगेश महादेव मनगटे, रा. भांडेवाडी नागपूर, प्रमोद अरुण चकोले रा. दिघोरी, अश्विन मोहन मसराम रा. मदनी दिंदोडा, अजय रामू डायरे रा. घोराड, स्वप्नील अंकित लक्ष्मीनारायण साहू रा. इतवारी गल्ली नागपूर, राहुल रामा उमरेडकर रा. नागपूर, रामदास फजितराव बोरीकर रा. जुनी मंगळवारी नागपूर यांना अटक केली असून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक कंगाले, अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, मारोती वरठी यांच्यासह कर्मचारी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here