आरटीई प्रवेशासाठी राष्ट्रीय बँकेत खाते गरजेचे! आवश्यक कागपत्रांची यादी जाहीर

वर्धा : प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्यातर्फे शैक्षणिक वर्ष 2022-23 साठीच्या आरटीई प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक करण्यात आले आहे. या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांच्या बदलाबाबतची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

यंदा पालकांचा निवासी पुरावा म्हणून गॅस एक बुक ग्राह्य न धरण्याचे आदेश दिले आहेत त्याऐवजी राष्ट्रीयकृत बॅंकेतच खातेधारक निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार असून इतर पतसंस्था, स्थानिक नागरी बँकांचे खाते पुस्तक ग्राह्य धरले जाणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मागील सत्रापर्यंत आरटीई प्रवेश प्रक्रियेत निवासी पुराव्यासाठी शिधापत्रिका वाहन चालविण्याचा परवाना, दुरध्वनी देयक, मिळकत कर देयक, गॅसबुक आधारकार्ड, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पारपत्र, बॅक खाते, स्थानिक बँकेचे खाते पुस्तक, आणि ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी नोंदणीतील असलेला भाडेकरार, हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. यातील भाडेकरार हा दुय्यम निबंधककार्यालयाचा नोंदणीकृत असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here