वर्धा : दिवसेंदिवस जिल्ह्यात मटका व जुगारांचे प्रमाण वाढत असून, पोलिसांनी छापेमारी करून वर्धा, हिंगणघाट व सेवाग्राम या तीन पोलिस ठाणे हद्दीत 16 जुगा-यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. जुगा-यांकडून मटक्याचे आकडे लिहिलेला सट्टापट्टीचा कागद व रोख रक्कम हस्तगत केली आहे.
वर्धा पोलिसांनी शुभम संतोष गौतम रा. आनंदनगर, हिंगणघाट पोलिसांनी पंकज दिलीपराव काळे, प्रवीण वासुदेव वाघ, महादेव नारायण देवतळे, आकाश सुरेश वाघमारे, शिवम राजेंद्र शिरभाये, शुभम मारोतराव डफ, पंकज विठ्ठलराव देवतळे, शुभम प्रमोद दुरबुडे, शुभम राजेंद्र शिरभाये, सतोश नारायण वाकडे, राकेश रमेश देवतळे, सचिन अशोकराव पराते व शुभम हेमराज रुद्रकार या 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर सेवाग्राम पोलिसानी शरद सिताराम तेलंगे व पद्माकर दशरथ शंळारकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.