धाम नदीपात्रात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला

पवनार : येथील धाम नदीपात्रात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवार (ता.१८) दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. धाम नदीपात्रातील एमआयडीसीच्या लोखंडी पुलात हा मृतदेह आढळून आला.

या पुलावरुन जात असताना काही शेतकर्यांना नदीपात्राच्या मधोमध वाहत आलेल्या ऐका झाडाच्या मोठ्या खोडाला पाण्यात वाहत आलेला महिलेचा मृतदेड अडकल्याचे दिसून आल्याने या घटनेची माहित सेवाग्राम पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच सेवाग्रामचे ठाणेदार घटणास्थळी येत पाहणी केली. गावातील पोहण्यात पटाईत असलेल्या युवकांना पाचारण करीत त्यांच्या मदतीने मृतदेह नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह उत्तरीय तपासनिकरीता पाठविण्यात आला. मृतदेहाची ओळख पटली नसून मृत्यूचे कारणही माहित पडले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here