
सेलू : शासनाकडून राशन दुकानदाराचे मागण्याकडे दुर्लक्ष केले जात असून महामारी असे पर्यंत कार्डधारकांचे आधार प्रमाणीकरण थांबवा अशी मागणी राशन दुकानदारानी तहसीलदार सेलू यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाने कोरोणाचे संकट पाहता नागरिकांनात्यांचे आधार प्रमाणीकरण न करता धान्य वाटप करण्याची परवानगी दिली जुलै अखेरपर्यंत ही मुभा दिली होती. आँगस्ट मध्ये परत जुन्या पध्दतीने अंगठ्याची पडताळणी करून धान्य पुरवठा करण्याचे आदेश दिले होते याबाबत राशन दुकानदार संघटनेने वरीष्ठाकडे तक्रारी दाखल केल्या यानंतरही शासनाने दखल घेतली नसल्याने कोरोणाचा प्रादुर्भाव पाहता राशन दुकानदारानी न्यायालयाकडे धाव घेतली उच्च न्यायालयाने कोरोणा महामारी असे पर्यंत कार्डधारकांचे आधार प्रमाणीकरण थांबवा असे म्हटले आहे. तरीही शासनस्तरावर कार्डधारकांचे आधार प्रमाणीकरण करून धान्य वाटप करण्याची सक्ती केली जात आहे. आजपर्यंत राज्यात ३० ते ४० दुकानदार यामुळे मृत्युमुखी पडले अलीकडे कोरोणाचे संकट गडद होऊ लागले असून कोरोणाबाधीताचा आकडा वाढला आहे. अशा परिस्थितीत कोणतेही विमा संरक्षण किंवा सुरक्षीतता नसताना जिव धोक्यात घालून राशन दुकानदाराना धान्य वाटप करणे अशक्य झाले आहे तेव्हा शासनाने पूर्वीप्रमाणे दुकानदाराचे आंगठा प्रमाणीकरण करून धान्य वाटप करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने केली आहे.
















































