उद्यापासून राज्यात काय सुरू आणि काय बंद? पाहा, एका क्लिकवर

सतीश खेलकर


मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्याची जोरदार तयारी सुरू केली असून, अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊन मी म्हणणार नाही, पण कडक निर्बंध म्हणत नियमावलींची घोषणा केली आहे. १४ एप्रिल ते १ मे या कालावधीत राज्यांत कडक निर्बंध लावण्यात आले असून, राज्यात काय सुरू राहणार आणि काय बंद राहील, याचा घेतलेला हा आढावा
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कडक निर्बंधांना ब्रेक द चेन असे नाव दिले आहे. राज्यात पुढील 15 दिवस कलम 144 लागू राहणार आहे. त्यानुसार राज्यात संचारबंदीचे आदेश लागू असणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या काळात काय सुरु आणि काय बंद राहणार, हे सर्वसामान्य जनतेसाठी अत्यावश्यक बाब आहे.

या गोष्टी राहणार सुरू

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होणार नाही. अत्यावश्यक सेवांसाठी वाहतुकीचा वापर सुरू राहणा असून, वैद्यकीय सेवा, वाहतूक सप्लाय चेन, लस उत्पादक आणि वाहतूक करणारे, मास्क, जंतूनाशक उत्पादक आणि वितरक, वैद्यकीय कच्चा माल निर्मिती करणारे कर्मचारी, जनावरांचे दवाखान्यातील कर्मचारी, शितगृहे, वेअर हाऊसिंग, बस, ऑटो, विविध देशांची राजनैतिक कार्यालये, पावसाळी कामे सुरु राहतील, सर्व बँका, सेबी, सेबीने मान्यता दिलेली कार्यालये, दूरसंचार सेवा, ई-कॉमर्स, अधिस्विकृतीधारक पत्रकार, पेट्रोल पंप सुरु राहतील, शासकीय आणि खासगी सुरक्षा मंडळे, आयटी सेवा सुरू राहणार आहेत. तसेच हॉटेल्स रेस्टॉरंट्सवर पूर्वीप्रमाणेच निर्बंध कायम असून, टेक अवे, होम डिलिव्हरी सेवा सुरू राहतील. रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांनाही परवानगी देण्यात आली असून, त्यांनीही पार्सल व्यवस्थाच सुरू ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या गोष्टी बंद राहणार

राज्यात १४४ कलम लागू पुढील १५ दिवस राज्यात संचारबंदी आदेश लागू असतील. अनावश्यक कारणांसाठी नागरिकांचं बाहेर फिरणं पूर्णपणे बंद असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here