
वर्धा : तालुक्यातील महाकाळ येथील रहिवासी असलेल्या अंबादास भानुदास ओरके (६६) याला बाल लैगिंग अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ नुसार दोन वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल अति. विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी दिला असून कलम 3५७ फौजदारी प्रक्रिया सहितेनुसार पीडितेला नुकसान भरपाई म्हणून ४ हजार रुपये देण्याचे आदेशात नमुद केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडिता आणि तिची आजी सायंकाळच्या सुमारास अंगणात बसले होते. दरम्यान आरोपी अंबादास ओरके याने तेथे येत पीडितेला लज्जा वाटेल असे कृत्य केले. त्याला पीडितेच्या आजीने हटले असता त्याने त्याच्या घरावरील छतावर जात पुन्हा आपले लज्ञास्पद कृत्य सूरू ठेवले. त्यानंतर पीडितेने आई व आजी सोबत सावंगी पोलीस स्टेनश गाठून तक्रार नोंदविली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेतली. या प्रकरणाचा तपास सावंगीचे तत्कालीन ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर यांनी पूर्ण करून आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणी न्यायालयात सहा साक्षदारांची साक्ष तपासण्यात आली. पुरावे व दोन्ही बाजूंचा युक्तीवाद लक्षात घेवून न्यायाधीश सूर्यवंशी यांनी आरोपीला शिक्षा ठोठावली. शासकीय बाजू अँड. विनय आर. घुडे यांनी मांडली.