

हिंगणघाट : मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्याने रोखसह दागिने लंपास केले. गौतम वॉर्ड येथे ही घटना घडली. योगेश घोडमारे याने पंचवटी हनुमान मंदिरात जात पाहणी केली असता दानपेटी फुटलेली दिसली. चोरट्याने दानपेटीतील पाच हजार रुपये आणि एक सोन्याचा टिका असा एकूण १४ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याचे दिसून आले. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.