नाट्यचळवळीत तरुणाईची भूमिका महत्त्वाची! निःशुल्क नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा संपन्न

वर्धा : कोरोनाणामुळे समाजात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहे. वाढती बेरोजगारी ,आर्थिक विवंचनेचा प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न यासारख्या सर्व सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नाट्यचळवळ वृद्धिंगत होणे गरजेचे आहे. नाट्य चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी तरुणाई महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते असे मत लायन्स क्लब गांधी चे अध्यक्ष संदीप चिचाटे यांनी शिववैभव संस्थेच्या कार्यालयात व्यक्त केले.

लायन्स क्लब गांधी सिटी व नाट्य प्रतीक थेटर अकॅडमी तर्फे निशुल्क नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी लायन्स क्लब गांधी सिटी चे अध्यक्ष संदीप चिचाटे, संचालक अनिल नरेडी सचिव गंगाधर पाटील, संजय आदमने, नाट्यदिग्दर्शक प्रतीक सूर्यवंशी, जीवन बांगडे, दिलीप रोकडे, आशिष पोहाणे, मनीष जगताप, ज्येष्ठ नाट्य कलाकार जयंत भालेराव, मोहन सायंकार, सीमा मुळे, प्राध्यापक अनवर सिद्दिकी, राजेश देशपांडे, प्राजक्ता मुते, चित्रा ठाकूर, प्रकाश खंडार, सतीश मिसाळ, नीलेश राऊत, महेंद्र परिहार, यांची प्रमुख उपस्थिती होती.

नाटकात समाजातील प्रश्न प्रखर रित्या मांडले जाते. नाटक हे सुसंस्कृत समाजाचे धोतक आहे असे मत लायन्स क्लब गांधी सिटी चे संचालक अनिल नरेडी यांनी व्यक्त केले. नाट्य कलाकार जयंत भालेराव, मोहन सायंकार सीमा मुळे यांनी नाट्य कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या. लायन्स क्लब गांधी सिटी वर्धा व नाट्य प्रतीक थेटर अकॅडमी तर्फे निशुल्क नाट्यप्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन होणार असून नाट्यकर्मी ना नाट्यदिग्दर्शक संदीप चिचाटे व प्रतीक सूर्यवंशी प्रशिक्षण देणार असून यात आंगिक अभिनय, वाचिक अभिनय, आहार्त अभिनय, सात्विक अभिनयाचे मार्गदर्शन केले जाणार आहे.

नाट्य कार्यशाळेत नक्षलवादी समस्येवर आधारित मनोज बनसोडे लिखित मित्तर, आतंकवादी समस्येवर आधारित ब्रेन वॉश, समाजाला थेट प्रश्न विचारणारी वांज, यासारख्या एकांकिका शिकविल्या जाणार असून यात मोहन सायंकार, सीमा मुळे, साक्षी हिवरे, प्रतिक मेघे, तन्वी ठोंबरे, अरशिया बेग, दीप्ती चव्हाण, संस्कृती चिचाटे, मंथन नखले, भूषण भोयर, श्रेयस गांजरे, अभिजित सुरवसे, चैतन्य गहेरवर, आदित्य फुलबोगे, तनुश्री हिवरे, सारंग नेवारे यांची प्रमुख भूमिका आहे. निशुल्क नाट्यप्रशिक्षण कार्यशाळेचा नाट्यकर्मीनी लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स क्लब गांधी सिटी व नाट्य प्रतीक थिएटर अकॅडमी तर्फे करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here