आर्वीत दहशत पसरविणाऱयाला अटक

वर्धा : आवी येथील संजयनगर येथे एका 24 वर्षीय युवकाला सार्वजनिक ठिकाणी चाकूच्या धाकाने दहशत पसरवित असल्याबद्दह पोलिसांनी अटक केली. आवी येथील संजयनगर येथे सार्वजनिक ठिकाणी सिमेंट रोडवर किराणा स्टोअर्स समोर हातामध्ये चाकूसारखे घातक शस्त्र घेऊन मोठमोठ्याने आरडाओरड करून लोकांमध्ये भिती दाखवून दहशत निर्माण करीत होता.

सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करीत असताना मिळून आल्याने आरोपीस ताब्यात घेवून विचारपूस केली असता आरोपीचे वडिल त्याला घरात येऊ देत नाही. त्याला धाक दाखविण्याकरिता हातामध्ये चाकू घेतला असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here