घरातून रोखेसह दागिने लंपास! भीमनगर येथील घटना

वर्धा : घरातील मागच्या बाजूला असलेल्या दारातून प्रवेश करून रोखसह दागिने चोरून नेले. या चोरीत चोरट्यांनी तब्बल २ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल ल॑पास केला. ही घटना हिंगणघाट येथील भीमनगर येथे २ नोव्हेंबर रोजी घडलो.

प्राप्त माहितीनुसार, सोनाबाई ज्ञानेश्‍वर मुसळे (वय 51) रा. भिमनगर या घरी हजर होत्या. दरम्यान, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घरातील मागच्या बाजूला असलेल्या दरवाजातून घरात प्रवेश केला. किचन रुममधील ठेवलेले लोखंडी कपाच्या लाँकरमध्ये ठेवलेले २ लाख ५ हजार रोख रक्‍कम, सोन्याचे कानातले झुमके ३ ग्रम वजनाचे एकूण वजन ६ ग्रँम अंदाजे किंमत १८ हजार रुपये, लांब पोते, सोन्याचे पदक, सोन्याचे काळे मणी असलेली प्रत्येकी ६ ग्रँम वजनाची एकूण वजन १२ ग्रँम अंदाजे किंमत ३६ हजार रुपये, २ चांदीच्या पायपट्ट्या कड्या असलेल्या प्रत्येक ८० ग्रँम वजनाच्या एकूण १६० ग्रम अंदाजे १६८० रुपये, २ चांदीच्या अंगठ्या प्रत्येक ५० ग्रँम वजनाच्या एकूण १०० ग्रँम अंदाजे किंमत २८०० रुपये असा एकूण २ लाख ६३ हजार ४८० रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी सोनाबाई मुसळे यांच्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांबिरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here