पुलगावातील दोघांकडून बारमालकावर चाकूहल्ला! पोलीसांत गुन्हा दाखल

वर्धा : पुलगाव नदीपात्रा पलीकडे अमरावती जिल्ह्यास प्रारंभ होते. अगदी वर्धा नदी संपताच परिसरात मोठ्या प्रपाणात बार थाटले आहेत. पुलगावसह वर्ध्यांतीलही नागरिक बारमध्ये दारु ढोसण्यासाठी जातात. पुलगाव येथील दोन युवक सावंगी येथील रहिवासी राजू जयस्वाल यांच्या मालकीच्या बारमध्ये दारु ढोसण्यासाठी गेले होते.

बारमध्ये राजू जयस्वाल यांचा मुलगा अनमोल जयस्वाल हा उपस्थित होता. दोघांनी त्याच्याशी वाद करीत चाकूहल्ला चढवला. या घटनेने गुन्हेगारी आपले पाय घट्ट करीत असल्याचे एकंदरित चित्र आहे. सध्या अनमोलवर सावंगी येथील रुणालयात उपचार सुरु असून याप्रकरणी मंगरुळ दस्तगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तेथील ठाणेदार सुरज तेलगोटे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here