साहेब, माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यास अटक कधी करणार? वडिलांचा टाहो! पोलिसांवर प्रश्नचिन्ह

हिंगणघाट : अल्पवयीन मुलीवर दोन वर्षांपूर्वी अत्याचार करून तिचा सतत मानसिक छळ करणाऱ्या आरोपीला अजूनही अटक करण्यात आलेली नसून, माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक केव्हा करणार, असा टाहो पीडितेच्या वडिलांनी फोडला असून, पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

आरोपी शुभम अंबेरे हा पीडितेचा सतत पाठलाग करायचा, पण पीडितेने याकडे दुर्लक्ष केले. जुलै, २०१९ मध्ये पीडिता शाळेत जातांना आरोपीने बळजबरीने तिला दुचाकीवर बसतून अल्लीपूर शिवारात एका निर्जनस्थळी नेत तिच्यावर अत्याचार करीत परत गावात सोडले आणि ही बाब कुणालाही सांगितल्यास बदनामी करेन, अशी धमकी दिली होती. त्यानंतर, आरोपी वारेवार तिला त्रास देत होता. मात्र, पीडितेने त्याला प्रतिसाद दिला नाही. अखेर ऑक्टोबर, २०१९ मध्ये पुन्हा आरोपीने पीडितेला दुचाकीवर नेत तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. याचा पीडितेला मानसिक आघात पोहोचला, एकदा तिला घरी येण्यास उशीर झाल्याने घरच्यांनी तीची विचारपूस केली असता, तिने सर्व आपबिती घरच्यांसमोर कर्थन केली. दरम्यान, हिंगणघाट पोलिसात जात तक्रार दाखल करीत, आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र, आज दोन वर्षांचा कालावधी लोटला असूनही त्याला अटक करण्यात न आल्याने, पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, आरोपीस अटक कधी करणार, असा टाहो पीडितेच्या वडिलांनी फोडला आहे. मात्र, आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती ठाणेदार संपत चव्हाण यांनी दिल्याची माहिती आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here