जांगोण्यातील 20 जीवंत मतदारांना दाखविले मृत

हिंगणघाट : हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील जांगोणा येथील मतदान केंद्रावर 20 मतदारांना मृत दाखविण्यात आले आहे. त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. पण वास्तविक पाहता हे सर्व मतदार जीवंत आहेत. शुक्रवारी ते मतदान करण्यासाठी आले असता त्यांना तुमचे नाव मतदान यादीतून मृत हे कारण पुढे करून कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. परिणामी त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले. या संदर्भात अँड. गुरूराज राऊत यांनी उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांची चूक मान्य केली. मात्र आता काही होऊ शकत नाही पुढल्या निवडणुकीत पाहू असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here