

समुद्रपूर : पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वायगाव हळद्या गावात एका विभक्त विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 27 फेब्रुवारी रोजी उघडीस आली. मृतक महिलेचे नाव मनीषा खोबरे (वय 33) रा. वायगाव असे आहे. मनीषाचा दोन वषांपूर्वी गुजरात राज्यातील मुसी येथे विवाह झाला होता. मनीषाचे पतीसोबत पटत नाल्याने ती मूळगावी आली. मात्र, मनीषाने कुणाशी विवाह केला होता, हेसुद्धा घरच्या सदस्यांना माहिती नाही. तिला लहान क्रिश नावाचा मुलगा आहे. आईच्या सहाऱ्याने मुलाला घेऊन राहत होती.
गावात फिरून विनाकारण कुणासोबत भांडण करायची. 26 फेब्रुबारीला ती ग्रामपंचायतमध्ये मुलाचे आधारकार्ड बनविण्याकरिता गेली होती. त्यावेळी काही नागरिकांना शिवीगाळ करून घरी परतली. मला कुणीही मदत करत नाही, म्हणून ती वौतागली आणि पहाटेच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मनीषाच्या आईला टिन वाजल्याचा आवाज येताच बघितले असता गळफास लागल्याचे दिसून आले. घटनेची माहिती छाया खोबरे यांनी पोलिसांना दिली. घटनेचा पंचनामा केला असून, पुढील तपास ठाणेदार प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक पंकज मसराम करीत आहेत.