वर्ध्याच्या हिंदी विद्यापीठ परिसरात पकडलेल्या बिबट्याचा मृत्यू! वनविभागाच्या निगरानीत होणार शवविच्छेदन

राहुल काशीकर

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठ परिसरातील जंगलात वावरणाऱ्या बिबट्याला काल दुपारी पावणेचार वाजताच्या दरम्यान वनविभाग तसेच पीपल फॉर अनिमल्सच्या चमूला एक ते दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद करण्यात यश मिळाले होते. त्याला पकडून वर्ध्याच्या करुणाआश्रमात ठेवण्यात आले होते. अखेर काल रात्री दीड वाजताच्या दरम्यान त्या बिबट्याचा मृत्यू झाल्याच्या माहितीला करूणाश्रमाचे आशिष गोस्वामी यांनी दुजोरा दिला.

हिंदी विद्यापीठ परिसरातील जगंलात वावरणाऱ्या बिबट्यावर काल दुपारी बंदुकीतून बेशुद्ध करणारा डॉट मारण्यात आला होता, तो बेशुद्ध होत निपचित पडल्यानंतर त्याला जाळीत टाकून वैद्यकीय तपासणीकरीता वर्ध्याच्या करुणाश्रमात नेण्यात आले होते. तो शुद्धीवर आला परंतू त्या बिबट्याला ताप, लिव्हर खराब आणि कावीळ शेवटच्या स्टेजवर असल्याने त्या बिबट्याचा काल रात्री दीड वाजताच्या सुमारास वर्ध्याच्या करुणाआश्रमात मृत्यू झाला, श्वविच्छेदन करून त्याच्यावर शासकीय वनविभागाच्या नर्सरीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे अशी माहिती आज गुरुवारी पीपल फॉर अनिम्लसचे आशिष गोसामी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here