जिल्हा परिषद सेसफंडातून शेतक-यांना 75 टक्के अनुदानावर कृषि साहित्य! संबंधित पंचायत समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन

वर्धा : शेतक-यांसाठी जिल्हा परिषदेच्या सेसफंड योजनेंतर्गत 75 टक्के अनुदानावर सबमर्शिबल विद्युत मोटरपंप संच, एचडीपीई पाईप, काटेरी तार करीता योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र शेतक-यांनी संबंधित पंचायती समितीकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

सबमर्शिबल विद्युत मोटरपंप संच, एचडीपीई पाईप व काटेरी तार ईत्यादी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे सातबारा आठ–अ असावा, लाभार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचा असल्यास जातीचा दाखला, आधार कार्ड, बॅक पासबुकची झेरॉक्स प्रत, अपंग असल्यास 40 टक्के अपंग असल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. सबमर्शिबल विद्युत मोटरपंप संच करीता अर्ज करणा-यांकडे विहिरीची नोंद असलेला सातबारा व नवीन डिमांड नोट, विज कनेक्शन बिल व मोटार पंप कालबाह्य झालेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. एचडीपीई पाईपकरीता अर्ज करणा-यांकडे ओलीताची नोंद असलेला सातबारा, विहिरीची नोंद असलेला सातबारा व ईलेक्ट्रीक विज बिल व मोटारपंप असल्याबाबत तलाठी प्रमाणपत्र आवश्यक आहे, असे कृषि विकास अधिकारी संजय बमनोटे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here