पत्रकारांवरील अन्यायाविरोधात केलेल्या यातना आंदोलनात विल्सन मोखाडे रक्तबंबाळ

वर्धा : पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी आज महात्मा गांधी पुतळ्यासमोर करण्यात आलेल्या यातना आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते विल्सन मोखाडे चांगलेच रक्तबंबाळ झाले.

पोलिसांनी सावधगिरी पाळत तात्काळ त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करीत उपचार सुरू केले. या आंदोलनात विल्सन मोखाडे गांधी पुतळ्यापुढे नारे देत होते. पोलिस कर्मचारीही आंदोलन शांततेत होऊ देत होते, पण विल्सन मोखाडे यांनी अचानक स्वतःच्या डोक्यावर काचेच्या शिश्या फोडणे सुरू केल्यानंतर पोलिसांची भांबेरी उडाली आणि क्षणात मोखाडे यांना ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले.

पत्रकार रवींद्र कोटंबकर यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर लूटमारीचा गुन्हा दाखल करावा, हल्ल्या प्रकरणी पालकमंत्री केदार यांच्यावर गुन्हा दाखल करावा, आदी मागण्यांची पुर्तता झालीच पाहिजे याकरिता हे यातना आंदोलन करण्यात आले.

वर्ध्यात प्रथमच झाले यातना आंदोलन

शरीरावर प्रहार करून स्वतःच्या अंगातून रक्ताच्या धारा काढणे, हा अफलातून प्रकार आज वर्धेकरांनी याचीडोळा अनुभवाला. जीवघेण्या आंदोलनात आज विल्सन मोखाडे बचावले असले तरी असे आंदोलन करण्याची गरज कोणामुळे भासली, याबाबत चिंतन करण्याची गरज पोलीस प्रशासनाला असल्याची जणसामान्यात चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here