

अल्लीपूर : येथिल गळोबा वॉर्ड भागातील रहिवासी जनाबाई अलमारी पवार (७०) यांचा राहत्या घरी मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. जनाबाई टिनाच्या झोपडीत एकट्याच राहत असून, दोन दिवसांपासून त्या घराबाहेर न आल्याने आणि परिसरात कुजल्यागत दुर्गधी सुटल्याने सरपंच चंदनखेडे यांनी पोलिसांना माहिती दिली. अल्लीपूरचे ठाणेदार सुनील गाडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाहून पाहणी केली असता जनाबाई यांचा मृतदेह झोपडीत आढळून आला, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद अल्लीपूर पोलिसांनी घेतली आहे.