ट्रकच्या धडकेत दोन ठार! हळदगावाजवळील घटना; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : नादुरुस्त ट्रकला मागाहून भरधाव येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. या धडकेत ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर गंभीर जखमी झाला. हा अपघात १० रोजी रात्रीच्या सुमारास झाला. याप्रकरणी समुद्रपूर पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली. मोहम्मद अमरुल्ला ईकराम रा. दिल्ली असे मृतक ट्रकचालकाचे नाव आहे.

मोहम्मद अमरुल्ला आणि शहानुर मुणकाद हे दोघे दिल्ली येथून चैन्नईकडे जाण्यासाठी यु.के. ०४ सी.ए. ९२१८ क्रमांकाच्या ट्रकने जात होते. दरम्यान नागपूर ते हैदराबाद मार्गावर असलेल्या हळदगाव शिवारात ट्रक गरम झाल्याने फेल पडला. चालक मोहम्मद याने ट्रक रस्त्याकडेला लावला आणि ट्रकची तपासणी करीत होता. दरम्यान मागाहून येणाऱ्या ट्रकचालकाने निष्काळजीपणे व हयगयीने ट्रक चालवून नादुरुस्त ट्रकला जबर धडक दिली. या अपघातात नादुरुस्त ट्रकची तपासणी करीत असलेला चालक मोहम्मद ईकराम याचा जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर शहानुर मुण्काद हा गंभीर जखमी झाला. समुद्रपूर पोलिसांनी अपघातस्थळी जात तत्काळ जखमीला रुग्णालयात पाठवून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. पंचनामा करुन आरोपी ट्रकचालक मथैय्युन यिनप्पन रा. कांमबटी ता. जि. सेलम, तामिळनाडू यास अटक केल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here