एसटीच्या १५७ बसगाड्यांनी अर्ध्या रस्त्यात सोडली साथ

वर्धा : एसटी बसच्या देखभालीवर वर्षाकाठी कोटी रुपयाचा खर्च होत असला तरी त्या मध्येच नादुरुस्त होण्याचा अनुभव प्रवाशांना सातत्याने येत असतो. यामुळे प्रवासी परिवहन महामंडळाप्रती वैताग व्यक्त करताना दिसतात. जिल्ह्यात मागील वर्षभरात बसस्थानकातून बाहेर पडल्यानंतर तब्बल १५७ बसेस पडल्या. जिल्ह्यातील दुर्दशीत रस्त्यामुळे एसटीला टायर पंक्चर होणे, सुट्याभागांचे नुकसान होणे आदींचा नेहमीच फटका बसतो. क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, ट्रान्समिशन सिस्टममध्ये बिघाड निर्माण होणे, इंजिन बंद पडणे याशिवाय इलेक्ट्रिकल अडचणींमुळे एसटी मध्येच नादुरुस्त होतात. यात बहुतांशवेळी प्रवाशांना धक्का मारावा लागतो. एखाद्या प्रवाशाला नियोजितस्थळी तातडीने जावयाचे असल्यास त्याच्याकडून अशावेळी संताप व्यक्त होतो.

वर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह आर्वी, हिंगणघाट, पुलगाव, तळेगाव (श्यामजी पंत) आदी पाच आगार आहेत. हे पाचही आगार मिळून एकूण २२८ बसगाड्या आहेत. संपूर्ण विभागात एकूण १५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. एसटीच्या दररोज ३४० ते २५० किलोमीटर फेऱ्या होतात. कोरोना विषाणू प्रादुर्भाव काळात तब्बल सात ते आठ महिने एसटीची चाके जागीच रुतली. त्यामुळे एसटीच्या देखभालीवरील खर्चाचे प्रमाण यंदा कमी राहिले. सध्या एसटी पूर्णक्षमतेने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि जिल्हाबाहेर धावत असून, एसटी रस्त्यात मधेच बंद पडण्याचे प्रमाण सध्या तरी आढळून आले नाही.रस्त्यात एसटी बस बंद पडण्याची कारणे एसटी बसच्या देखभालीवर कोटीचा खर्च होत असला तरी गाड्यांमध्ये क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, ट्रान्समिशन सिस्टममध्ये बिघाड निर्माण होणे, इंजिन बंद पडणे, टायर पंक्चर होणे याशिवाय इलेक्ट्रिकल अडचणी आल्यास रस्त्यात मध्येच एसटी बस बंद पडतात. मात्र हे प्रमाण आता कमी झाले आहे.

दहा वर्षांवरील ९० बसेस
वर्धा विभागांतर्गत वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, तळेगाव (श्यामजी पंत), पुलगाव आदी पाच आगार असून, एकूण २२८ बसगाड्या आहेत. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसार १५ वर्षांपर्यंत बस वापरता येते. मात्र, वर्धा विभागांतर्गत साधारणत: ८ ते १० वर्षांपर्यंतच बसगाडीचा वापर केला जातो. १२ वर्षांनंतर बस स्क्रॅपमध्ये काढली जाते अथवा या गाड्यांचे रूपांतर मालवाहतूक गाडीत केले जाते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता वर्धा विभागाकडून सुस्थितीतील बसेस उपयोगात आणल्या जातात. तसेच बस गाड्यांच्या मेन्टेन्स कडेही लक्ष विशेष लक्ष दिले जाते, असे आगारातील सुत्रांकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here