क्षुल्लक कारणावरून तिघांचा एकावर चाकुहल्ला! शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; बोरगाव (मेघे) येथील घटना

वर्धा : नजीकच्या बोरगाव (मेघे) येथील पोलीस चौकीसमोर क्षुल्लक कारणावरून वाद करून तिघांनी एकावर चाकुहल्ला करीत त्याला जखमी केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात जखमीच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बोरगाव (मेघे) येथीळ पोलीस चौकी नेहमीच कुलूपबंद राहते.

प्राप्त माहितीनुसार, स्टेशन फैल येथील रहिवासी आफताब ऊर्फ मोंडा सोहेल अकिल खान (२१) हा नेहमी प्रमाणे बोरगाव (मेघे) पोलीस चौकीसमोरील आसिफ याच्या चाइनिजच्या हातगाडीवर गेला होता. आफताब हा आसिफ याच्याशी गप्पा करीत असताना अशोकनगर येथील लखन लोंडे, बॉबी लोंडे तसेच साहिल लोंडे यांनी तेथे येत आफताब याच्याशी वाद करून त्याला चाकूने मारहाण करून जखमी केले.

याप्रकरणी जखमी आफताब याच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३२४, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here