संगीत मानसिक स्वास्थ्य प्रदान करते : अभ्युदय मेघे ; लायन्स क्लब गांधी सिटी व प्रगती संगीत विद्यालय तर्फे संगीत सभेचे आयोजन

वर्धा : कोरोना रोगामुळे लोकांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ बिघडत असून संगीत मानवाला मानसिक स्वास्थ प्रदान करते असे मत वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष अभ्युदय मेघे यांनी लायन्स क्लब गांधी सिटी वर्धा व प्रगती संगीत विद्यालय तर्फे आयोजित संगीत सभेचे व्यक्त केले.या कार्यक्रमाचे आयोजन लायन्स क्लब गांधी सिटी च्या कार्यालयात करण्यात आले होते.

याप्रसंगी लायन्स क्लब गांधी सिटीचे अध्यक्ष संदीप चिचाटे, संचालक अनिल नरेडी, सचिव गंगाधर पाटील, संजय आदमने, रमा विलास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक झाडे, प्रशांत बुरले, पवन तिजारे, जीवन बांगडे, दिलीप रोकडे, भास्कर वाळके, प्रकाश खंडार, विद्या कळसाईत, नलिनी चिचाटे, विजय महेशगौरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अध्यक्ष संदीप चिचाटे यांनी संगीत मानवाला पवित्रतेची अनुभूती देते असे मत व्यक्त केले.अनिल नरेडी यांनी संगीत सभे ला शुभेच्छा दिल्या तर प्रगती संगीत विद्यालयाचे अध्यक्ष जीवन बांगडे यांनी संगीत हेच जीवन असल्याचे मत व्यक्त केले.

लायन्स क्लब गांधी सिटी व प्रगती संगीत विद्यालय तर्फे आयोजित संगीत सभेत गुरुवर्य अजित दादा कडकडे यांचे शिष्य अमित कुमार लांडगे यांनी ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी ‘ मोगरा फुलला, टाळ सांगे चिपळीला यासारखे एका पेक्षा एक भजन सादर केले तर सुप्रसिद्ध गायिका सानिका बोभाटे हिने मराठी हिंदी गझल, भावगीते, फिल्मी गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.मंजिरा वादक दिवाकर डेहनकर यांनी उत्कृष्ट साथ दिली. सुप्रसिद्ध व्हायलिन वादक वसंत जळीत, तबला वादक जीवन बागडे, हार्मोनियम वादक दिलीप रोकडे, अमित लांडगे, सानिका बोभाटे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला वर्धा कला उपासक संघातर्फे किरण पट्टेवार, धनंजय नाखले, रवी खाडे, प्रवीण पेठे, व्यक्तिमत्व विकास मंच तर्फे विजय बाभुळकर, चित्रा ठाकूर, ममता बालपांडे, ओंजळ सामाजिक संस्थेतर्फे प्राजक्ता मुते, नृत्य परिषदेतर्फे किरण खडसे, गझल गायक अजय हेडाऊ, राजेश देशपांडे, नाट्य प्रतिक ऍकॅडमीचे प्रतीक सूर्यवंशी, नीलेश राऊत महेंद्र परिहार, वर्षा बोकडे, मंगला पेदुलवार, स्मिता चिचाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here