मालवाहूची बैलबंडीला धडक! २ जखमी; सेलू रोडवरील तुळजापूर येथील घटना

तुळजापूर : शेतीकाम आटोपून कापूसाचे गाठोडे बंडीत भरून आणत असताना मालवाहू गाडीने दिलेल्या धडकेत दोन शेतकरी जखमी झाले. ही घटना सेलू रोडवरील मौजा तुळजापूर येथील डंभारे यांच्या शेताजवळ गुरूवारी रात्री ६.३० वाजताच्या दरम्यान घडली.

मालवाहू चालक संदिप व सहकारी मित्र गजबे यांची गाडी सेलू मार्केटवरून कापूस विकून तरोडा येथे जात असता अपघात झाला. या अपघातात अक्षय येडे (२१) व राजू बहेरे (५५) हे दोन शेतकरी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत मदत केली. सेलू पोलिस ठाण्यात अपघाताची सूचना दिली. वाहनचालक व त्याचा सहकारी घटनास्थळी दोन तास थांबल्याने गाडीमालक तरोडा येथून घटनास्थळी हजर झाले.

सेलू रोड चांगला झाला असून वाहने सुसाट वेगाने पळतात. अशात अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दैनंदिन होणारे अपघात पाहता येथील शेतकऱ्यांना शेतात शेतीकामास बैलबंडी घेऊन जातांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. त्यासाठी सा. बा. विभागाने लक्ष देत वाहनांचा वेग कमी व्हावा, म्हणून गाव दिशादर्शक फलक तसेच चौकावरीळ रोडवर गतिरोधक टाकावे व सिग्नल बसवून उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी, मजूर, वाहनधारकांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सेलू रोडवर अपघाताची मालिका सुरूच असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here