जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कोविडची लस

वर्धा : पहिल्या फळीतील कोविड योद्धांना सध्या कोरोनाची प्रतिबंधात्मक लस दिली जात असून, मंगळवारी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था या केंद्रावर पोहोचून कोरोनाची लस टोचून घेतली. आतापर्यंत जिल्ह्यातील १२ हजार ३१६ कर्मचाऱ्यांना कोविडची लस देण्यात आली आहे.

१६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. सुरुवातीला आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. तर आता महसूल, गृहरक्षक, पोलीस विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. आरोग्य विभागातील १७ हजार ५०७ कर्मचाऱ्यांपैकी ११ हजार २७७, पोलीस विभागातील २ हजार ९६९ कर्मचाऱ्यांपैकी ५६८, महसूल विभागाच्या ७२८ कर्मचाऱ्यांपैकी १६७, नगरविकास विभागाच्या १ हजार ३९८ कर्मचाऱ्यांपैकी २९० तर तर ग्रामविकास विभागाच्या १९ कर्मचाऱ्यांपैकी १४ कर्मचारी अशा एकूण २२ हजार ६२१ कर्मचाऱ्यांपैकी १२ हजार ३१६ कर्मचाऱ्यांनी कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here