एकच खळबळ उडाली! गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

अल्लीपूर : येथील सदानंद वॉर्डातील रहिवासी प्रफुल्ल संजय कडवे (२४) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली होती.

सदानंद याने रात्रीला कुटुंबीयांसोबत जेवण केले. त्यानंतर कुटुंबीय झोपले. पण सकाळी सदानंदची आई उठल्यावर तिला सदानंद याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर याची माहिती अल्लीपूर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच अल्लीपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद अल्लीपूर पोलिसांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here