

वर्धा : बहिणीबाबत अष्लविलळ का बोलला, या कारणातून वाद करीत युवकास जबर मारहाण केली. इतकेच नव्हे तर जखमी युवक रुग्णालयात असताना तेथे जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना तुकाराम वॉर्ड परिसरात घडली.
शिवम दिवाकर माथनकर रा. धंतोली याला भाजीविक्रीच्या व्यवसायासाठी हातगाडी हवी होती. दरम्यान तो परदेशीपुरा परिसरात असलेल्या आकाश कांबळे याच्याकडे गेला. त्याच्याकडून हातगाडी खरेदी केली. ५ हजार रुपयांत सौदा झाला. त्यानंतर आकाश शिवमला घरी सोडून देत असता त्याने एका निर्जनस्थळी नेत माझ्या बहिणीबाबत काय बोलला, असे म्हणून विटेने डोक्यावर जबर मारहाण केली. शिवम रुग्णालयात उपचार घेत असताना आकाशने रुग्णालयात जाऊनही जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.