
पवनार : येथील विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष स्व. शेषरावजी भांडवलकर यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले. त्या निमित्ताने मा. खासदार अमर काळे यांनी त्याच्या घरी जाऊन सांत्वना भेट दिली. भेटी दरम्यान स्व. शेषरावजी भांडवळकर यांच्या सोसायटीच्या ४० वर्षांच्या अध्यक्षीय कार्यप्रणालीचा शब्दसुमनानी गौरउद्गार काढले.
यावेळी पवनार काँग्रेस कमिटीच्या सदस्यांनी येथील विविध समस्या विषयी खासदार अमरदादा काळे यांचे सोबत चर्चा केली. पांधन रस्ते, दत्तमंदिर वॉर्ड क्र. ३ मधील शेड, व गावातील काही रस्त्यांचे दुरुस्तीसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पुरुषोत्तम टोणपे, माजी प. स. सदस्य प्रमोद लाडे, माजी ग्रा. प. सदस्य मोरेश्वर हुलके, मनीष ठाकरे, रामुजी मगर, प्रशांत सावरकर, विलास धवणे, सोसायटीचे अध्यक्ष रणजित भांडवलकर, संदीप भांडवलकर, संचालक शिशिर राऊत, अशोकराव भट, बाळुभाऊ ठाकूर, रमेश भुरे, रोशन पेटकर यांची उपस्थित होती.



















































