नादुरुस्त असलेल्या उभ्या ट्रकला भरधाव ट्रकची धडक! गंभीर जखमी चालकावर उपचार सुरू

समुद्रपूर : येथील चंद्रपूर-नागपूर महामार्गावर हिरडी शिवारात उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला भरधाव येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजतादरम्यान घडली. सूरज मेंढे (३०) रा. नागपूर असे जखमी ट्रक चालकाचे नाव आहे.

चंद्रपूरकडून नागपूरकडे जाणा-या महामार्गावर हिरडी शिवारात एम.पी.०४ एच.ई.५५७५ क्रमांकाचा ट्रक नादुरुस्त असल्याने रस्त्याच्या कडेला उभा होता. त्यास संरक्षण कठडा आणि वाहतूक वळविल्याची माहिती देणारा कठडा लावला होता. तरीही मागाहून भरधाव येणाऱ्या एम.एच.४०-६१५९क्रमाकांच्या ट्रकने जबर धडक दिली. या ट्रकचा चालक सूरज मेंढे हा स्टेअरिंगमध्ये दबून गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र जाम येथील पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांच्यासह नरेंद्र दिघडे, देवेंद्र पुरी, विनोद थाटे, दीपक जाधव, निखिल वाडकर, ज्योती राऊत यांनी घटनास्थळी जाऊन चालक सूरज मेंढे याला समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here