भरधाव कारची दुचाकीला धडक! एक ठार; अपघाताची नोंद पुलगाव पोलिसांनी घेतली

पुलगाव : नाचणगाव येथून पुलगावकडे जात असलेल्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिली. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली असून, या अपघाताची नोंद पुलगाव पोलिसांनी घेतली आहे.

प्राप्त माहितीनुसार, गाडगेनगर पुलगाव येथील प्रदीप शंकर चौधरी (४३) हे दुचाकीने (क्र. एम.एच. ३२ टी. ८००१) नाचणगाव येथून पुलगावच्या दिशेने जात. होते. दुचाकी महामार्गावरील नाचणगाव चौफुली येथे येताच वर्धेकडून अमरावतीच्या दिशेने जात असलेल्या कारने (क्र. एम.एच. ३० बी.डी. १३८१) दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचालक प्रदीप शंकर चौधरी याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पुलगाव पोलिसांनी घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here