पोलिस असल्याची बतावणी करून ३ लाख १० हजार रूपये लुटले

पांढरकवडा : पोलीस असल्याची बतावनी करून एका आयचर ट्रक चालकाकडून ३ लाख १० हजार रूपये लुटल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील साखरा गावाजवळ दुपारी १२ ते १ वाजता घडली. फुलय्या यानाडीया मौघेली रा.मंगाडी आंध्रप्रदेश असे आयचर चालकाचे नाव आहे

वरील आयचर चालक आपल्या वाहनातील माल उत्तरप्रदेशात घेवून गेला होता. सदर माल खाली करून तो राष्ट्रीय महामार्ग ४४ ने आंध्रप्रदेशातील निल्लुर येथे परत जात होता. राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील केळापूर तालुक्‍यातील साखरा गावाजवळ उड्डानफुलाखाली दीन ते तीन ईसमानी त्यांचे वाहन अडवीले व पोलीस असल्याची बतावनी करून वाहनाची झडती घेतळी त्या दरम्याने ३ लाख १० हजार रूपये त्या अज्ञात चोरट्याने लंपास केले. आपल्या गाडीतील पैसे चोरून नेल्याचे लक्षात येताच फुलय्या मौघेली यांनी पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे येवून सदर माहीती दिली. चोरीची घटना डघली असता स्थानिक पोलीसांच्या वतिने ही घटना कोणासही कळू नये याची पुरेपुर खबरदारी घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here