आंदोलनाला बसलेल्या महिला वाहकाची प्रकृती खालावली! एसटी कामगारांचे कामबंद आंदोलन चालूच

वर्धा : ऐन दिवाळीत सरकारने एसटी कामगारांची बोळवण केल्याने वर्धा आगारासमोर एसटी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले चौथ्या दिवशी आंदोलन सूरूच आहे. आंदोलनाला बसलेल्या ऐका महिला कर्मच्यारी यांची अचाणक प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुषमा धोंगडे रा. वर्धा असे कर्मचारी महिलेचे नाव आहे.

जोपर्यंत एस. टी. महामंडळाचे राज्यशासनात विलगीकरण होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा संघटनेने घेतला आहे. कर्मचाऱ्यांना मान्य केलेल्या आर्थिक प्रश्‍नांची सोडवणूक प्रशासनाकडून होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अडचणीचे जात आहे.

महिनाभर काम करूनही वेतन वेळेवर दिल्या जात नाही कामगार करारानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेले फायदे वेळेवर मिळत नाहीत शासकीय कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २०१९ पासून २८ टक्के महागाई भत्ता दिल्या जात असून रा.प. कर्मचाऱ्यांना फक्त १२ टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. अशा विविध समस्या घेऊन कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलावे काय असा प्रश्‍न एसटी कामगारांनी सरकारला केला आहे. कोरोना काळात कर्मचार्‍यांनी जिवाची पर्वा न करता अहोरात्र प्रवाशांची सेवा केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊन ३०६ कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे.

अशा कठीण परिस्थितीत रा प कामगार आपले काम प्रामाणिकपणे करीत आहे. असे असतानांही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने एसटी कामगारांमध्ये फार मोठा असंतोष पाहायळा मिळत आहे. दिवाळीसारख्या सणात समोर आपले हक्काचे देयके कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याने उपोषणा सारख्या निर्णय संयुक्‍त कृती समितीने घेतला कर्मचार्‍यांना दिवाळीचा तुटपुंजे भक्ता दिल्याने कर्मचाऱ्यांची सरकारने बोळवण केल्याचा आरोप एसटी कामगारांनी केला आहे. आंदोलनात सुरेश नेहारे, जी. साठोणे, किशोर तिवारी, गोविंदा मुरकुटे, शिवदास खंडारे, शरद काकडे, अपसरखॉ पठान, यशवंत बावस्कर, संजय बोदंरे, विशाल सूर्यवंशी, विलास मानकर यांच्यासह कर्मच्यार्यांचा समावेश आहे.

प्रवाशांचे होत आहे हाल…

गेल्या चार दिवसापासून एस. टी. कर्मच्यार्यांचे कामबंद आंदोलन चालू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. खाजगी वाहतूकीने प्रवाशांच्या खिशाला कात्री बसत आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे नागरीकांचे आता लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here