माझ्या नादाला लागलीस तर जीवाने ठार मारेल! प्रियकराने दिली भर चौकात प्रेयसीला धमकी

वर्धा : विवाहिता बहिणीसोबत घरी जात असताना प्रियकर घरी आला असता विवाहितेने तुझ्यामुळेच माझे लग्न तुटण्यावर आले, आता तुच माझ्याशी लग्न कर, असे म्हटले असता संतापलेल्या प्रियकराने चक्क विवाहितेस माझ्या नादाला लागलीस तर जिवाने ठार मारेल, असे म्हणत शिवीगाळ करुन विवाहितेचा विनयभंग केला. ही घटना खरांगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (गोंडी) येथे घडली.

२3 वर्षीय विवाहितेचे लग्नापूर्वी आरोपी राहुल आमदरे याच्याशी प्रेमसंबंध होते. विवाहितेचे लग्न झाल्यावर तिने त्याच्याशी संबंध तोडले. दरम्यान विवाहिता ही तिच्या मोठ्या बहिणीसोबत घराकडे जात असताना आरोपी राहूल हा तिच्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश करुन विवाहितेशी बोलू लागला. दरम्यान विवाहितेने राहूलला तुझ्यामुळेच माझे लग्न तुटण्यावर आले. आता सोडचिठ्ठी होत आहे त्यामुळे आता तूच माझ्याशी लग्न कर, असे म्हटले असता आरोपी राहूल याने रस्त्यावर जात शिवीगाळ करुन तु माझ्या नादाला लागू नको, नाहीतर तुला जीवाने ठार मारेल, अशी धमकी दिली.

यामुळे रस्त्यावरील नागरिकांनी विवाहितेच्या घरासमोर गर्दी केली होती. यामुळे विवाहितेच्या मनात लज्जा निर्माण झाली असुन विवाहितेचा विनयभंग केल्याने राहूल आमरदरे रा. खरांगणा हेटी याच्याविरुद्ध खरांगणा पोलिसात तक्रार दिली आहे. सध्या महिलांवरील अत्याचारात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. विनयभंग, अत्याचारा आदीसारख्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्याने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाआहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here