वाळूमाफीयांकडून मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी! सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल

पवनार : येथील वाळू माफीयाचा अवैध वाळूसाठा गावालागत असलेल्या शेतात साठवून असल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्धी केल्याच्या कारणावरून दैनिकाच्या प्रतिनिधीला घरी जाऊन अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी (ता. २२) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पवनार येथील वार्ताहर गणेश नारायणराव हिवरे यांनी अवैधरित्या सुरु असलेल्या वाळूसाठ्याची बातमी प्रसिद्धी का केली या कारणावरून मद्यप्राशन करून अशोक वाघमारे व सतीश हिवरे या दोघेही राहणार पवनार यांनी गणेश हिवरे यांना घरावर हल्ला केला. रात्री त्यांच्या घरी जाऊन अशील शिवीगाळ करून लाता बुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

गेल्या अनेक दिवसापासून या वाळूमाफीयांचा पवनार परिसरात वाळू चोरीचा व्यवसाय चालू आहे. गावालगत असलेल्या शेतामध्ये वाळूचा अवैध साठा करुन चढ्या भावाने ही चोरीची वाळू विक्रीचा व्यवसाय अनेक दिवसापासून चालू आहे. याबाबत वृत्त प्रकाशित केल्याने पित्त खवळलेल्या वाळूमाफीयांनी गणेश हिवरे यांच्यावर घरी जात हल्ला चढवला त्यांना लाता बुक्क्यांनी मारहान केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची तक्रार सेवाग्राम पोलिसात करण्यात आली आहे. या घटणेचा अनेकांनी निषेध नोंदविला आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here