आर्वीतील अनधिकृत टॉवरवर होणार कारवाई

वर्धा : शहर व तालुक्यात जवळपास २० मोबाइल अनधिकृत टॉवर आहेत. या मोबाइल टॉवरच्या रेडीएशनमुळे हृदय, कर्करोग आदी सारखे महत्त्वाचे रोग नागरिकांना जडावत असल्याची माहिती समोर आली आहे. मोबाइलचा अतिवापर व टॉवरची वाढती संख्या यामुळे ग्रामीण भागात पक्ष्यांचेही जीवनमान धोक्‍यात आले आहे. आर्वी शहरात वसंतनगर परिसरात २००२ पासून विनापरवानगी मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहे. या टॉवरबाबत योग्य चौकशी करून कारवाई केली जाईल, असे सूतोवाच मुख्याधिकारी नगर परिषद यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here