

वर्धा : भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या पोलवर आदळल्याने गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारांदरम्यान, सेवाग्राम रुग्णालात मृत्यू झाला. संदीप नारायण सातपुते (35) रा. मदनी असे मृत युवकाचे नाव आहे. संदीप हा मागील दोन वर्षांपासून नेहमी मदनी ते भानखेडा येथे जे-जा करीत असे. भानखेडा येथे पंकज देवढे यांच्या डेरी फार्मवर दुध वाटण्याचे काम करत होता. भानखेडा येथून एम.एच. 32 एम 1012 ने मदनीला येत असताना त्याची टर्निंगवर दुचाकी अनियंत्रित झाल्याने तो पोलला जाऊन धडकला होता. या प्रकरणी संकेत सुरेश सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीनरून सेवाग्राम पोलिस ठाण्यात मर्ग नोंद करण्यात आला आहे.