क्षुल्लक वादातून भावंडांना केली मारहाण

हिंगणघाट : साक्षगंधाच्या कार्यक्रपात डीजेचा आवाज का कमी केला, या कारणातून वाद करीत दोघांना मारहाण करण्यात आली. वालपूर येथे ही घटना घडली. राकेश ठाकरे याला दुर्योधन बाळबुधे हा शिवीगाळ करीत होता. दरम्यान हेमंत जोगवे हा तेथे गेला आणि विचारणा केली असता, दुर्योधन बाळवुधे आणि ऋक्षभ बाळबुधे याने तू डीजेचा आवाज कमी का केला. या कारणातून शिवीगाळ करीत असल्याचे समजले. हेमंतने समजविण्याचा प्रयत्न केला असता रॉडने प्रारहाण केली. तसेच लहान भाऊ वाद सोडविण्यास आला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here