महाडीबीटीवर शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले! शेतकऱ्यांची निवड ऑनलाइन लॉटरी पद्धतीने

0
88

वर्धा : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य व गळीत धान्य पिके रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्याक्षिके, सुधारित कृषी अवजारे व सिंचन सुविधा साधने याबाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी १० सप्टेंबरपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने अर्ज करताना संबंधित कृषी सहाय्यकांशी संपर्क करून १० हेक्‍टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी. हरभरा प्रमाणित बियाणे वितरण दहा वर्षाआतील वाणास २५ रुपये प्रतिकिलो, दीड वर्षावरील वाणास १२ रुफ्ये प्रतिकिलो व रब्बी ज्वारी १० वर्षाआतील वाणास 3० रुपये प्रतिकिलो व १० वर्षांवरील वाणास १५ रुपये प्रतिकिलो असे एकूण किमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची निवड ऑनलाइन लॉटरी पद्धतीने होणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here