पॉश कारमधून २२ किलो गांजा जप्त! दोघांना अटक, तिघे फरार; सेवाग्राम पोलिसांनी केली कारवाई

वर्धा : शहरात अवैधरीत्या विक्रीसाठी दाखल होणारा २२ किलो ८५० ग्रॅम गांजा (अमली पदार्थ) पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी १० रोजी करण्यात आली. या प्रकरणी ७ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे, तर तीन जण पसार आहे. त्याच्या ताब्यातून अमली पदार्थ गांजासह कार मोबाइल असा १२ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस विभागाच्यावतीने अवैध व्यवसायावर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. यात देशी विदेशी दारूंवर रोज कारवाई होत असली तरी दारूविक्री वाहतून जोरात सुरूच आहे. अवैध व्यवसायावर कारवाईसाठी रात्री गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गांजा शहरात दाखल होत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी छापा मारला असता दोघे एमएच ४९ एएस ६१८२ क्रमांकाच्या कारमध्ये मिळून आले. तर दोघे पसार झाले. कारची झडती घेतली असता त्यातून २२ किलो ८५० ग्रॅम गांजा, दोन मोबाइल असा १२ लाख ५७ हजारांचा मुद्देमल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले असून अशात अक्षय राजेंद्र कमद (२९ रा. चितळी, जि. सातारा हल्ली मुक्काम सह्यांद्री हॉस्पिटल पुणे, गौरव दिनकर शेंडे (२३ रा भिवापूर, जि. वर्धा) अशी अटक करण्यात आली आहे. तर सचिन साठे (रा. धारावीर ले-आउट दत्तपूर वर्धा, अमित पांडे रा.वायगाव, रवींद्र नावाचा व्यक्‍ती रा. इमुरीपल्ली (ओडिशा) हे पसार झाले. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here