रागातून महिलेने घेतले स्वतःला जाळून! सालई पेवठ येथील घटना; उपचारदरम्यान मृत्यू

वर्धा : नवऱ्याने पतीच्या वडिलांना शिविगाळ केली. त्यात पत्नीला राग आल्याने स्वतः डिझेल अंगावर ओतून जाळून घेतले. रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सेळ्‌ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सालई पेवठ येथे घडली. गायत्री प्रफुल्ल नेहारे (26) रा. सालई पेवठ, असे महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, घराशेजारी आरोपी नेहारे यांचेसोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर आरोपी व मृतक हे काही दिवस आरोपीचे वडिलांचे घरी राहिले. त्यांच्यात वाद होत असल्याने मृतक व आरोपी हे वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. दरम्यान त्यांच्यात नेहमीच वाद होत होता. आरोपी हा मृतकला शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारझोड करीत होता. 3 फेब्रुवारी रोजी आरोपीने मृतकाच्या वडिलांना शिवीगाळ केल्याने मृतक महिलेला राग आला. त्यानंतर महिलेने डिझेल अंगावर ओतून स्वतःला जाळून गेले. याप्रकरणी विजय कोकाटे यांच्या तक्रारीवरून सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here