चोरीला गेलेली दुचाकी जप्त! दुचाकी चोरट्यास अटक

वर्धा : घरासमोरून दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्यास रामनगर ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून अटक करण्यात आली आहे. यातील फिर्यादी नामे साहिल इस्माईल सुफी हा मयूर बोरकुटे यांच्या घरी किरायाने सानेगुरुजी नगर, साई मंदिर जवळ, आर्वी नाका येथे राहतो. फिर्यादीने नेहमीप्रमाणे दुचाकी क्र. एम.एच. 32 एआर.4958 (किंमत 45 हजार) हॅण्डल लॉक करून घरासमोर उभी करून रूमवर झोपी गेला.

दुसऱ्या 2 ऑगस्ट 2021 रोजी 7 वाजता फिर्यांदीने त्याची दुचाकी बघितली असता चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी रामनगर पोलिसांत तक्रार दिली होती. या गुन्ह्यातील तपासात गोपनीय खबरेवरून आरोपी नामे सूर्यमान गुरलीधर चौधरी (वय 35) रा. यमुना लॉनजवळ आलाडी रोड, नालवाडी, वर्धा याला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेली दुचाकी जप्त केलो. ही कारवाई गुन्हे प्रगटीकरण पथकाचे प्रमुख नरेंद्र पाराशर, पंकज भरमी, संदीप खरात, अजय अनंतवार, अजित सोर आदींनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here