कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या! खापरी येथिल घटना

वर्धा : शेतात खर्चाच्या तुलनेत उत्पन्न होत असल्याने बॅकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून विठ्ठलराव लक्ष्मण नगराळे (वय 80) रा. खापरी ता. हिंगणघाट या वृद्ध शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवार 15 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता मौजा खापरी शेतशिवारात घडली.

मृत शेतकरी नगराळे यांच्याकडे बँक ऑफ इंडियाचे कर्ज असल्याची माहिती आहे. मृतकाच्या पत्नीला पती घरात दिसत नसल्याने मुलाला गावाबाहेर शोध घेण्यास सांगितले. मुलगा शेतात शोधण्यास गेला असता मृतकाची चप्पल विहिरीजवळ आढळून आली. तसेच गावातील लोकांच्या मदतीने विहिरीत गळ टाकला असता मृतकाचे प्रेत वर आले. याप्रकरणी बंडू विठठुलराव नगराळे रा. खापरी ता. हिंगणघाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वनडेर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here