टेंडरच्या नावाखाली 7.70 लाखांची फसवणूक! व्यावसायिकाला घातला ऑनलाइन गंडा

वर्धा : ऑनलाइन टेंडर देण्याच्या नावाखाली वर्धा शहरातील व्यावसायिकाची 7 लाख 70 हजार रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध वर्धा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शहर पोलिस करीत आहेत.

सविस्तर व्रत असे की, यातील फिर्यादी शहेजाद हुसेन अली (वय 35) यांचे एच. आर. स्टील नावाचा महादेवपुरा येथे व्यवसाय आहे. फिर्यादी 13 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता आपल्या मोबाईलवर ऑनलाइन टेंडर वेबसाइट पाहत होता. सदर वेबसाइट ओपन केल्यानंतर वेबसाइटचे डिटेल आले. त्यातील मोबाईल नंबरवर फिर्यादीने फोन करून ऑनलाइन टेंडर उपलब्ध करता काय, अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपीने हो म्हणत अमरावती, अकोला व वर्धा येथील टेंडरबद्दल सांगितले. त्यांतर फिर्यादीने वर्ध्याचे टेंडर हवे आहे, असे म्हटल्यानंतर जॉईन करण्यासाठी 3500 रुपये जमा करावे लागतील, असे म्हणत आरोपीने त्याचा एटीएम नंबर दिला, त्यावर पैसे जमा केले.

त्यानंतर दुस-या दिवशी फिर्यादीला तुमच्या टेंडरसाठी ईएमडी 15 हजार रुपये लागतील, ते तुम्हाला नंतर परत केले जातील, असे सांगण्यात आले. त्यानंतरही वारंवार फिर्यादीची दिशाभूल करत एकूण 7 लाख 70 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर अर्जदाराने बँकेत जाऊन स्टेटमेंट काढल्यानंतर फिर्यादी पाठवित असलेले बँक अकाठंटद्वारे दोघांनी मिळून फसवणूक केल्याचे लक्षात आले. याबाबत शहेजाद हुसेन अली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पवनकुमार व राजेश कुमार दोन्ही रा. संगमबिहार गेहरोळी, साउथ दिल्ली या दोघांविरुद्ध वर्धा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here