एकाच कुटुंबातील पाच जणांचा खून! आरोपीचीही आत्महत्या

नागपूर : तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा खून करून आरोपीने केली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. पाचपावली फाटकाजवळील चिमाबाई पेठ येथे ही घटना घडली.

अलोक माथूरकर (४८)असे आरोपीचे नाव आहे. तो गेल्या आठ महिन्यापूर्वी अमरावतीवरून नागपुरात राहायला आला होता. चिमाबाई पेठ येथे भिसीकर यांच्या घरी किरायाने राहत होता. तो टेलरिंगचं काम करत होता. त्याच्याच घरी सासू लक्ष्मी बोबडे आणि मेव्हणी अमिषा बोबडे देखील राहत होत्या. मेव्हणी अमिषाचे प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानंतर त्याने सासूला विचारणा केली. यावरून सासू आणि अलोकमध्ये वाद झाला. त्यानंतर त्याने मेव्हणीच्या बेडरुममध्ये जाऊन तिला मारले. त्यानंतर मुलगी परी (१४)आणि मुलगा साहिल (१२) या दोन्ही मुलांच्या जेवणात विष घातले. त्यामुळे मुलांचा देखील मृत्यू झाला. त्यानंतर बायको विजया (४५)आणि सासू लक्ष्मीचा देखील खून केला. सर्वांना मारल्यानंतर त्याने स्वतः आत्महत्या केली.

दरम्यान, सकाळी उठल्यानंतर शेजाऱ्यांना कोणीही घराबाहेर दिसले नाही. त्यामुळे त्यांनी घरात जाऊन बघितले असता सहा मृतदेह आढळून आले. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here