पावसाचे पाणी मुरल्याने घराची भिंत कोसळली! मुलाच्या हाताला दुखापत काकडदरा येथील घटना; ४० हजारांचे नुकसान, भरपाईची मागणी

तळेगाव : नजीकच्या काकडदरा येथील वॉर्ड क्रमांक ६ मधील रहिवासी साहेबराव वानखडे यांच्या घराची भ्रिंत कोसळल्याने मुलगा जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.

विक्की साहेबराव वानखडे असे जखमी युवकाचे नाव आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाचे पाणी या भिंतीत मुरल्याने रविवारी सकाळी अचानक ही भिंत कोसळली. यात विक्कीला दुखापत झाल्याने त्याला आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार केल्यानंतर विक्कीला सुटी देण्यात आली. ही भिंत कोसळल्याने साहेबराव वानखडे यांचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

घटनास्थळी उपसरपंच पप्पू भुयार यांनी धाव घेऊन तलाठी किसन कौरती यांना माहिती दिली. साहेबराव यांची परिस्थिती हलाखीची असून, मोलमजुरी करून ते संसाराचा गाडा हाकतात. शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here