पवनारात वीजपुरवठा खंडीत होण्यास नाही तोटा! कारण नसतानाही होते बत्ती गुल; वितरण विभागाचा बेताल कारभारामुळे नागरीक त्रस्त

पवनार : येथील विजपुरवठा कोणतेही कारण नसताना वारंवार खंडीत होतो. थोडासाही वारा किंवा पाऊस आला तरी विजपुरवठा तासणतास सुरळीत होत नाही. याबाबत वारंवार ग्रामस्थांकडून तक्रारी होत असल्या तरी यावर कोणतीच उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये विज वितरण विभागाविषय तिव्र असंतोष निर्माण होत आहे.

मागील वर्षी असाच प्रकार सतत घडत होता त्यावेळी पमचायत समीती सदस्य प्रमोद लाडे, भिम टायगर सेनेचे तालुका अध्यक्ष विशाल नगराळे यांनी या विभागाच्याय कार्यालयात जात येथील अभियंत्याची कानउघडणी केली असता विजपुरवठा सुरळीत झाला होता मात्र गेल्या काही महिन्यापासुन परत ग्रामस्थांना हा त्रास सहन करावा लागत आहे.

येथील विजपुरवठा बेभरवशाचा झाला आहे. येथील वीज वितरण विभागाच्या मनमानी कारभारामुळे हा प्रकार सतत चालू आहे. पावसाळ्यापुर्वी कोणतीही खबरदारी घेतल्या गेली नाही परिणामी हा प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. मात्र यावर कधी उपाययोजना होईल असा सवाल आता ग्रामस्त विचारु लागलेले आहेत. असे असताना विज वितरण विभाग गाड झोपेत असल्याचे सोंग घेवुन आहे. यावर तात्काळ उपाययोजना करावी अंन्यथा महावितरणाच्या विरोधात तिव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्तांनी दिलेला आहे.

प्रतिक्रीया

येथील महावितरण विभागाच्या अधिकार्यांनी नागरीकांना होणार्या अडचणी लक्षात घेता स्थानीक कर्मचार्यंना आदेश देवुन लवकरात लवकर यात सुधारना करावी आणि नागरीकांना होणार्या अडचणी दुर कराव्या अंन्यथा भिम टायगर सेना याविरोधात तिव्र आंदोलन छेडल याची विजवितरण विभागाने नोंद घ्यावी.

विशाल नगराळे
तालुका अध्यक्ष भिम टायगर सेना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here