समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; महिला पोलिस निरीक्षकाचा मृत्यू

वर्धा : पोलिस वाहन ट्रकला मागून धडकल्याने भीषण अपघात झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर येळाकेळी जवळील पांढरकवढा गावानजीक शनिवार (ता. २९) सकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातात पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल तर तीन कर्मचारी आणि आरोपी गंभीर जखमी झाले.

एचआर. ०३ जी.व्ही. १७८२ क्रमांकाच्या बोलेरो पोलिस वाहन नागपूरकडे जात होते. दरम्यान पांढरकवडा गाव परिसरात पोलिस वाहन समोरील एम.एच. १७ बी.झेड. ६५७७ क्रमांकाच्या ट्रकला मागाहून धडकले. या भीषण अपघातात पोलिस वाहनाचा समोरील भाग चेंदामेंदा झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here